झी टॉकीज तर्फे वारकऱ्यांसाठी पाणी आणि प्रथमोपचाराची सोय!!

वारीचा प्रवास हा जवळपास वीस दिवसांचा असतो. इतका मोठा प्रवास पायी करत असतांना, पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार सामग्री या गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या असतात. त्यातच यंदा पुणे आणि परिसरात पाण्याच्या दुर्लभतेमुळे, परिस्थिती वारकऱ्यांसाठी आणखी कठीण होण्याची शक्यता होती.

पण, झी टॉकीजने विठ्ठलभक्तांसाठी पाण्याची चोख व्यवस्था केली आहे. झी टॉकीजमार्फत, वारीच्या मार्गावर पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी प्रथमोपचाराची सोयदेखील करण्यात आली आहे. या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या झी टॉकीज वाहिनीचे वारकऱ्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *