सिध्दार्थ आणि अनुला भेटण्याची चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण !

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका सध्या तुफान गाजते आहे. या मालिकेद्वारे पहिल्यांदाच शशांक आणि मृणालची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोघांना आणि यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मृणाल आणि शशांक यांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेर देखील आहेत. आपल्या लाडक्या आणि आवडत्या कलाकाराला भेटण्याची इच्छा प्रत्येकालाच असते वा हि संधी मिळाली तर कोणाला नाही आवडणार कलर्स मराठीने नुकतीच हि संधी सिध्दार्थ आणि अनुच्या म्हणजेच शशांक आणि मृणालच्या चाहत्यांना दिली.

याचसोबतच मालिकेमध्ये दुर्गा हि अत्यंत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या वंदना गुप्ते यांना देखील भेटण्याची संधी मिळाली. चाहत्यांसाठी हे एक सरप्राईजच होतेत्यांना सेटवर बघून चाहत्यांना खूप आनंद झाला. मालिकेमध्ये सान्वीची भूमिका साकारणारी विधीषा आणि नेहाची भूमिका सायली परबदेखील सेटवर उपस्थित होत्या. सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहेज्यामध्ये सिद्धार्थने अनुला प्रपोज केले आहेसिद्धार्थसाठी हा क्षण खूप महत्वाचा होता.

परंतु  तो असे काही करणार आहे याची कल्पना अनुला मात्र नव्हती. आता प्रपोज कसे करावे हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. आणि यासाठीच कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून एक कॉनटेस्ट घेतली होती ज्यामध्ये प्रेक्षकांनी सिद्धार्थला अनुला प्रपोज करण्याच्या काही युक्त्या दिल्या. आणि त्यामधीलच काही विजेत्यांना मिळाली मृणाल आणि शशांक यांना सेटवर भेटण्याची सुवर्णसंधी. निशांत उघडे, तेजस जोशी, अनुश्री चव्हाण, प्रतीक्षा मोरे आणि प्रियंका बने.

आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्याचा आनंद त्यांना शब्दांमध्ये व्यक्त करणे खूपच कठीण झाले. काहींनी त्यांच्यासाठी मिठाई आणली, तर काहींनी पुष्पगुच्छ. यामधील निशांत उघडे या चाहत्याचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी होताआणि इतके सुंदर गिफ्ट त्याला वाढदिवसानिमित्त मिळाले या बद्दलचा आनंद त्याने व्यक्त केला. या चाहत्यांना मालिकेच्या सेटची टूर देखील करायला मिळाली. सगळ्या चाहत्यांनी सेट बघितला, मनातल्या गोष्टी सांगितल्या, मनसोक्त गप्पा मारल्या, फोटोसेल्फी काढले.

वंदना गुप्ते, मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांच्यासोबत चाहत्यांना मिळालेला काही वेळ त्यांच्या नेहेमीच स्मरणात राहील. खूप आठवणी आणि काही सुंदर क्षण चाहते घेऊन गेले आणि मृणाल आणि शशांकला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *