सिद्धार्थला मिळणार का अनुचा होकार ? सुखाच्या सरींनी हे मन बावरे !

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे… सिद्धार्थला जॉब मिळाला असून त्याला आता पहिला चेक मिळाला आहे. आणि त्याने ठरवले आहे आता तो अनुला लग्नाची मागणी घालणार आहे. आणि हीच गोष्ट तो आजी आजोबांना सांगत असताना संयोगीता ऐकते आणि ती दुर्गाला जाऊन सांगते कि, सिद्धार्थ अनुला लग्नाची मागणी घालणार आहे.

आता दुर्गा आणि सान्वीला हे कळल्यावर दुर्गा यामध्ये कसे अडथळे आणणार ? सान्वी कुठली खेळी खेळणार? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर. असं म्हणतात प्रेमात खूप ताकद असते. त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला तरीसुध्दा सिद्धार्थला त्याचे खरे प्रेम मिळेल का ? आणि ते तो मिळविण्यासाठी काय करेल ? हे येत्या भागांमध्ये कळेलच.

अनुला प्रपोज करण्यासाठी सिद्धार्थने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण हॉटेल त्याने खूप सुंदर सजवून घेतले आहे. एकदम रोमँटिक वातावरण तयार केलं आहे, पण अनुला याची कल्पना नाहीये, ती या सरप्राईज पासून अनभिज्ञ आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आणि ती केमिस्ट्री अखेर त्यांना अनुभवायला मिळाली. अनु त्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर तिला खूप मोठे सरप्राईज मिळते.

सिद्धार्थ आणि अनुमध्ये बऱ्याच गप्पा होतात, ते डान्स करतात. कुठेतरी सिद्धार्थचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण अखेरीस सिद्धार्थ अनुला लग्नाची मागणी घालणार आहे. आता अनु सिद्धार्थला होकार देईल का ? अवी आणि त्याच्या आठवणी अनु विसरून सिद्धार्थला स्वीकारेल का ? हे तुम्ही नक्की बघा बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *