मंतरलेल्या घरात येणार आणखी एक नवा पाहुणा पहा कोण आहे तो !

झी युवा ही मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येत असते. ‘एक घर मंतरलेलं’ ही रहस्यकथा यापैकीच एक आहे. मृत्युंजय बंगल्याचं गूढ, त्याचा गार्गीच्या आयुष्याशी आलेला संबंध आणि तिच्या आयुष्यात घडत असलेल्या अनाकलनीय घटना यांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. सर्वांनाच खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेत एक नवे पात्र नुकतंच प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

‘मृत्युंजय’चे रहस्य अधिकच गुंतागुंतीचे होत असतांना, ते सोडवण्यासाठी गार्गीला हे पात्र मदत करतंय. नरहरी खंडागळे या सरकारी अधिकाऱ्याचे हे पात्र अभिनेता सुनील बर्वे साकारत आहेत. खंडागळे यांनी लिहिलेला मजकूर गार्गीच्या हाती लागला आहे. म्हणूनच गार्गी त्यांच्या शोधात आहे. सुनील बर्वे साकारत असलेला नरहरी खंडागळे, ‘मृत्युंजय’ बंगल्या विषयीचे गूढ सोडवण्यासाठी उपयोगी असलेल्या काही फार महत्त्वाच्या गोष्टींची माहिती गार्गीला देणार आहे.

तिला नेमकी काय माहिती मिळते व त्यामुळे तिला काय फायदा होतो हे बघणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. खंडागळे आणि गार्गी यांच्यात घडणारे संभाषण या रहस्याच्या शोधला नवी कलाटणी देणारे ठरेल. वाड्याचे रहस्य सोडवत असतांना नवेनवे दुवे गार्गी गोळा करत आहे. असाच एखादा महत्वपूर्ण दुवा गार्गीच्या हाती लागतोय का? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘एक घर मंतरलेलं’ सोमवार ते शनिवार, रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’वर!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *